बौधकारोचे बारा प्रश्न-
आंबेडकरी मित्रांसाठी काही महत्वपूर्ण वाद-प्रतिवादाचे विषय
१. बुद्ध केवळ वाद आणि कॉंट्रोव्हर्सी निर्माण करायला निवडलेला विषय (कि) वयक्तिक आणि सामूहिक जीवनाचे मार्गदर्शन करायला निवडलेला तथागत?
२. बुद्ध केवळ बौद्धिक रोमांटिकीकरण करायला निवडलेला साधन (कि) जीवनाला शील-सदाचाराचे सम्यक अनुशासन देणारा पुढारी?
३. तात्विक चर्चांसाठी बुद्ध एक मनोरंजक विषय ठरतो पण वयक्तिक, सामूहिक, सांस्कृतिक आणि राजकीय नीतीमध्ये बुद्ध-धम्माच्या शीलांची उपेक्षा का?
४. बुद्धाला विविध तत्वज्ञानांच्या रांगेत ठेवून त्याला एक दार्शनिक म्हणून स्वीकार असतो पण त्याला शास्ता म्हणून स्वीकारून त्याने दिलेल्या संघ-उपासक संस्कृतीला आचरणात अंबालबजावणी करायला नकार का?
५. दारू-गांजा-सिगारेट व विविध मादक पदार्थांचे सेवन करून, भाषेत शिवीगाळ ठेवून व या गोष्टींना समर्थन करून व्यक्तीला बुद्धाच्या मार्गावर असण्याचा दावा करता येईल का?
६. बाबासाहेबांनी एक खरा सत्यशोधक होऊन सत्याचा शोध लावल्यानंतर जगाला बुद्धाचा सोपा व सरळ मार्ग देऊन हि स्वतः ला बौद्ध म्हणून घेण्याचा अस्वीकार का?
७. ‘सत्यशोधक’ ओळखीचा व संस्कृतीचा स्वीकार पण ‘बौद्ध’ ओळखीचा व संस्कृतीचं स्वीकार का नाही?
८. बाबासाहेबांनी ‘बुद्ध किंवा कार्ल मार्क्स’ स्पष्ट करून देऊन ६७ वर्षांनंतरहि आंबेडकरी तत्वांमध्ये आणि नितीमध्ये कार्ल मार्क्सच्या विचारांची मिसळ करण्याची गरज का?
९. बाबासाहेबांनी स्वतः अती कष्टाने नीतिबद्ध केलेल्या, त्यांच्या ब्रेनचाईल्ड नीतीवर आणि त्यावर आधारित संगठन (समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पक्ष) नाकारून मार्क्सवादी विचारांवर आधारित (किंवा मिसळ केलेल्या) संगठनांवर विश्वास का?
१०. बौद्ध-रिपब्लिकन हि आंबेडकरी राजकीय विचारधारा नाकारून दलित-बहुजन सारख्या जातीयवादी विचारधारेवर विश्वास का?
११. आकाशाएवढी विशाल व वैश्विक, प्रज्ञा, करुणा, मैत्री, स्वातंत्र्य, न्याय, समतेची नीती असतांना समाज बांधणी व मानवकल्याणाकरिता आंबेडकरी संगठनांच्या पुनर्बांधणीच्या विचारांचा व कृतींचा अभाव का?
१२. आंबेडकरी-बौद्ध म्हणून एक बळकट समूह होऊन स्व व जनकल्याणाकरिता एकसंघ होण्यात अडथडे कोणते?
– बौधकारो डॉ. वृत्तांत मानवटकर, ७ मे २०२३