काल ह्या पोस्टला अनेक मित्रांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. खूप जणांनी पसंत केली पण त्याच बरोबर काहींनी त्यांचा शब्दांत या कृतीतून होणाऱ्या चुकींची नोंद केली. असल्या कृतींचे गाम्भीर्य पाहता आणि त्यावरून लोकांवरती प्रभाव लक्षात घेऊन आम्हालाही वाटतं कि या टीका करणं आवश्यकच आहे. लोकांनी असं करायला नको आणि याचं अनुसरण हि नको हे आमचे हि ठाम मत आहे. बाबासाबांचे दैवतीकरण हे आम्हाला मान्य नाही हे स्पष्ट आणि सरळ आहे यात काहीच दुमत नाही. म्हणून, चूक समाजाच्या निदर्शनास आणणे महत्वाचे आहे.
पण हे जे काही घडत आहे, ते परिवर्तन आहे काय? असं जे कोणी लोकं करत आहेत त्यांच्यात बदलेची आशा ठेवायची काय? आणि समाजामध्ये सम्यक प्रबोधन करतांना असल्या कृतींवर/प्रकारांवर आपली मांडणी तठस्थ ठेऊन खरंच परिवर्तन साधेल काय? या प्रश्नांचे उत्तर शोधून त्यांवर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशी मंगलकामना ठेवून काम करणे जास्ती महत्वाचे आहे.
परिवर्तन होत असतांना जर ते परिवर्तन माणसाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे तर आम्ही त्या परिवर्तनाची दाखल घेऊ आणि त्याला आम्ही आशावादी दृष्टीकोणाने हाताळू. किंचित हि बदल असेल तरी चालेल. पोस्ट बद्दल मत स्पष्ट करतांना आम्ही इतकं सांगू इच्छितो कि या कृतीचे समर्थन व नकार दोन्ही न करता, आम्ही होत असलेल्या प्रकाराच्या सत्याला जाणण्याचा प्रक्रियेत आहोत. म्हणून, वर मांडलेल्या प्रश्नांना सोडवण्याच्या दिशेत प्रयत्नशील आहोत.
माणसाला धर्माची नितांत गरज आहे हे अधोरेखित सत्य. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे, बाबासाहेबांच्या शब्दांत, ‘गरिबांना धर्माची अत्यंत गरज आहे’. जेव्हा आपण हे सत्य समजून विचार करू तेव्हाच आपल्याला गरीब-शोषित लोकांच्या ईश्वराकर्षणाचे कारणं सापडतील. या जाणिवेशिवाय प्रकाशाकडे नेणारी वाट शोधणं अशक्यच.
सम्यक दिट्ठीने पाहता, स्वतःला कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेच्या दोषाशी अलिप्त ठेवून आपण ईश्वरवाद्यांत होत असलेल्या परिवर्तनाला निश्चितच साक्षी होऊ शकतो. खरं पाहिलं तर, अंधश्रेद्धेत बुडलेल्या ईश्वरवाद्याला बाबासाहेब कधीच सहजासहजी पटत नसतो. त्याचा बाबासाहेबांच्या बुद्धिवादाला कायमचा नकार असतो. बाबासाहेब आंबेडकर नावाची तलवार त्याच्या काल्पनिक सुखाच्या मोहजाळला कापणारी असते म्हणून तिच्या असल्याने तो अस्वस्थ असतो. भारताच्या अनेक प्रांतात आंबेडकर-द्वेषाचे उदाहरण या सत्याचे साक्षी आहेत. असो.
याच बबरोबर, ‘भीम कावड’, ‘भीम चालीसा’, ‘दीपदानुत्सव’ इत्यादी अश्या वेगवेगळ्या प्रकाराने ईश्वरवादी लोकं आपली भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात आपापली पाहूलं चाचपळत असतात. गुलामीची मानसिकता इतक्या सहज जात नसते.
अश्या परिस्थितीत जर ईश्वरवादी लोकं बाबासाहेब स्विकारण्याच्या प्रक्रियेत, डोक्यावर बाबासाहेब घेऊन वारी करतात तर त्याला पूर्णपणे नाकारणे हा चुकीचा पर्याय ठरेल. अश्या परिस्थितीत टोकाची तठस्थ भूमिका ठेवून परिवर्तनाची पाहूलं फेटाडून काढणे म्हणजे अंधारातून उजेडाच्या वाटेचे आशावाद फेटाडून काढणे. आपल्या अवती भवती पाहालं तर आपल्याला अशे अनेक ईश्वरवाद्यांचे उदाहरणं सापडतील जे आधी अंधश्रेद्धच्या अंधारात होते पण हळू हळू, बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशाने त्यांच्या जीवनात उजेड येऊ लागला. आता ते बुद्धाच्या सम्यक मार्गावर अग्रेसर आहेत.
उजेड हा सहजासहजी एकादमाने येत नसतो. सम्यक बोध हा एका चिंतनाने येत नसतो. सम्यक बोधाच्या संपादनाची आणि प्रतिपादनाची प्रक्रिया निरंतर सुरु असते. हो, व्यक्तींच्या वयक्तिक-सामाजिक परिस्थितीनुसार या प्रक्रियेच्या गतीत व तीव्रतेत फरक असतो. मग, समाजात जर काही परिवर्तन घडून येत असेल तर त्याची नोंद घ्यायची आणि त्याचसोबत त्यावर आशावादी दृष्टीने काम करायची जबाबदारी आपली. आपण स्वतः अंधश्रद्धाळू लोकांच्या सोबत मागे न जायची काळजी ठेवून, जर बाबासाहेबांच्या मार्गावर यायला त्यांना प्रेरित करू शकलो तर तीच मंगल कृती.
मेत्ता गाथेतील “सब्बे भद्रानि पस्सन्तु, माकञ्चि दुक्खमागमा” म्हणजेच, “सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो” याचे प्रत्यक्ष साकारायला, माणुसकीच्या जाणिवेतून दुःख ओळखणे गरजेचे आहे. या प्रबोधनाने, आपण सर्वांची, दुःखातून दुःखमुक्तीची आणि अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरु राहो हीच मंगलकामना.
बुद्धाच्या प्रबोधनात्मक चळवळीचा हा एक नमुना आपल्याला एक नवा मार्ग देईल –
महानाम सुत्तात नोंद असलेली बुद्ध आणि तरुण महानाम यांच्या संवादातून प्रेरित हि गोष्ट.
एके दिवशी एक तरुण खूप अस्वस्थ अवस्थेत बुद्धाकडे आला.
‘काय झालं?’ बुद्धांनी विचारलं
तरुण म्हणाला:
‘भगवान, काल माझे वडील वारले. मी तुमच्याकडे खास विनंती घेऊन आलो आहे. कृपया माझ्या मृत वडिलांसाठी काहीतरी करा. जेव्हा सामान्य पुजारी काही संस्कार किंवा विधी करतात तेव्हा त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो. तर भगवान, तुमच्या सारख्या महापुरुषाने माझ्या वडिलांसाठी कोणतेही संस्कार केले तर त्यांना स्वर्गात प्रवेशच नाही तर कायमस्वरूपी निवास मिळेल.
म्हणून भगवान, कृपा करून माझ्या वडिलांसाठी काहीतरी करा!
तो इतका असंतुलित, इतका भावनिक होता कि बुद्धांना माहित होते की कोणत्याही प्रकारच्या तर्कसंगत युक्तिवादाचा या टप्प्यावर काहीही परिणाम होणार नाही परंतु गोष्टी समजावून सांगण्याची त्यांची स्वतःची पद्धत होती. त्याने तरुणाला बाजारात जाऊन दोन मातीचे मडके खरेदी करण्यास सांगितले.
हि काही अद्भुत विधीची तयारी आहे असा विचार करून त्या तरुणाने आनंदाने जाऊन ते विकत घेतले. बुद्धांनी त्याला एका मडक्यात लोणी आणि दुसर्यामध्ये दगड आणि खडे भरण्यास सांगितले. त्याने हे सर्व केले. बुद्धाने त्याला नीट बंद करून बंद करण्यास सांगितले आणि त्या दोन्ही मडक्यांना जवळच्या तलावात टाकण्यास सांगितले. त्याने तसेच केले आणि दोन्ही मडके तळाशी बुडाली. बुद्धाने आता त्याला एक जाड काठी आणायला सांगितली आणि नंतर त्या काठीने त्या मडक्यांना तोडायला सांगितले. आता बुद्ध आपल्या वडिलांसाठी एक अद्भुत विधी करतील या विचाराने त्याने तसेच केले.
भारत हा एक विस्तीर्ण आणि प्राचीन भूमी आहे, विविधतेने आणि टोकांनी भरलेला आहे. एकीकडे अशी लोक आहेत ज्यांना जीवनाचा सम्यक बोध आहे आहे, आणि दुसरीकडे, खोल अज्ञानात असलेले लोकहि आहेत. अंधश्रद्धा आणि कट्टरतेनी ग्रस्त आहेत.
आता बुद्धाच्या आदेशाने वडिलांचे अंत्यसंस्कार होत असतांना तरुण प्रसन्न होता. वडिलांची स्वर्गाची तयारी म्हणून हे मडकं फोडायला सांगत आहेत. त्याने अशी कृती करताच एका मडक्यातून लोणी तलावाच्या पृष्ठभागावर तरंगू लागले; आणि लगेच दुसऱ्या दुसऱ्या मडक्यातून खडे निसटले आणि तळाशी स्थिरावले.
बुद्ध म्हणाले, “मी एवढे केले आहे. आता तू तुमच्या सर्व पुरोहितांना बोलव. त्यांना इथे येऊन प्रार्थना करू दे: ‘अरे खड्यांनो, पृष्ठभागावर तरंगत या! अरे लोणी, तळाशी बुड!’’
यावर तरुण म्हणाला, ‘काय भगवान, मस्करी करताय तुम्ही? हे कसे शक्य आहे? हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. खडे पाण्यापेक्षा जड असतात; ते खाली राहण्यास बांधील आहेत, ते तरंगू शकत नाहीत. लोणी पाण्यापेक्षा हलके आहे, ते तरंगणे बंधनकारक आहे; ते खाली जाऊच शकत नाही.’
बुद्ध म्हणाले, ‘तरुणा, तुला निसर्गाच्या नियमाविषयी बरंच काही माहीत आहे आणि तरीही सर्वांना लागू होणारा कायदा समजून घ्यायचा नाही. जर तुझे वडील खडे, दगड यांसारखी कृती करणारे असतील तर ते पाण्याच्या खाली जाण्यास बांधील होते. आणि जर ते लोण्यासारख्या कमी वजनाचे असतील तर ते वर जाण्यास बांधील आहेत.
आपली अडचण अशी आहे की आपण आपल्या स्वतःच्या वर्तन पद्धती, आपल्या स्वतःच्या कृती बदलण्यासाठी काहीही करत नसलो तरीही काही अदृश्य शक्ती आपल्याला अनुकूल करेल असे आपल्याला वाटते. जेव्हा आपण निसर्गाचा हा शाश्वत नियम समजतो – की फळे आपल्या कृतींवर अवलंबून असतात – तेव्हा आपण आपल्या कृतींबद्दल सावध होतो.
अश्याप्रकारे सम्यक देसना करून तथागतांनी अंधश्रेद्धेच्या बंधनात अडकलेल्या अस्वस्थ महानामाची सुटका केली.
- बौधकारो डॉ. वृत्तांत